MPSC मार्फत तब्बल 362 जागांची भरती; अर्ज सुरू…

MPSC Recruitment 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक आयुक्त या पदांसाठी भरतीची सूचना जाहीर केली आहे. एकूण ३६२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २० मे २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून २०२५ आहे. MPSC ची अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ आहे.

या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील आणि निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये कुठेही नियुक्त केले जाईल. उमेदवाराचे वय १९ ते ४५ वर्षांदरम्यान असावे. खुला प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ७१९/- रुपये तर मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग/ अनाथ/ अपंग उमेदवारांसाठी ४४९/- रुपये शुल्क आकारले जाईल.

या भरतीमध्ये एकूण ३६२ पदांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापक पदासाठी ४७ जागा, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ०४ जागा आणि सहायक आयुक्त पदासाठी ३११ जागा उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्राध्यापक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे MD, DNB, बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, MBBS सह M.Sc., M.Sc. सह Ph.D., M.Sc. सह D.Sc., DM, डिप्लोमेट किंवा M.Ch. यापैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी, उमेदवारांनी M.D. (फॉरेन्सिक मेडिसिन) किंवा DNB (फॉरेन्सिक मेडिसिन) पदवी घेतली असावी आणि त्यांना संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सहायक आयुक्त या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे पशुवैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असणे बंधनकारक आहे.

हे पण वाचा » पनवेल महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!

प्राध्यापक पदासाठी मासिक वेतनश्रेणी रु. १,४४,२०० ते रु. २,१८,२०० पर्यंत आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मासिक वेतनश्रेणी रु. १,३१,४०० ते रु. २,१७,१०० पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सहायक आयुक्त पदासाठी मासिक वेतनश्रेणी रु. ६०,००० ते रु. १,९०,८०० पर्यंत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत होत असलेल्या विविध पदांच्या 362 जागांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात 1 आणि अधिकृत जाहिरात 2 सविस्तर वाचावी. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी MPSC च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.