IRCTC Recruitment 2025: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. IRCTC ने सल्लागार पदांसाठी भरती जाहीर केली असून, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार IRCTC ने दिलेल्या अधिकृत मेल वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IRCTC च्या या भरतीद्वारे सल्लागार पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जून आहे. ही भरती प्रामुख्याने मुंबई (महाराष्ट्र) विभागासाठी असून, येथे काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झाल्यास, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 19 मे 2025 रोजी 64 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नियमांनुसार उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
हे पण वाचा » NCB अंतर्गत 183 पदांसाठी सरकारी नोकरीची संधी!
आयआरसीटीसीच्या या भरतीसाठी उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. पात्र उमेदवार खालील दोनपैकी कोणत्याही एका पद्धतीने अर्ज सादर करू शकतात:
• ई-मेलद्वारे: अर्जाचा फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात swati.chitnis@irctc.com या ईमेल पत्त्यावर पाठवावीत.
• पोस्टद्वारे: आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची हार्ड कॉपी पुढील पत्त्यावर पाठवा: व्यवस्थापक (मानव संसाधन विकास), आयआरसीटीसी लिमिटेड, पश्चिम क्षेत्र कार्यालय, फोर्ब्स बिल्डिंग, ग्राउंड अँड थर्ड फ्लोअर, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१.
हे पण वाचा » हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत 209 जागांची भरती!
IRCTC भरती 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.