मुंबई विद्यापीठ येथे डिप्लोमा, पदवी, टायपिंग, MSCIT झालेल्यांना नोकरीची संधी!

मुंबई: मुंबई विद्यापीठाने विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात क्रमांक: UoM/HRDC/03/2025 प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण 94 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पदवीधर किंवा डिप्लोमा पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल 2025 आहे.

भरती अंतर्गत खालील पदांचा समावेश आहे:

यामध्ये वित्त आणि लेखा सहाय्यक (15 जागा), निम्न श्रेणी स्टेनोग्राफर (4 जागा), ज्युनिअर इंजिनिअर (स्थापत्य) (6 जागा), ज्युनिअर इंजिनिअर (विद्युत) (2 जागा), कायदा सहाय्यक (4 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (10 जागा), ग्रंथालय सहाय्यक (2 जागा), इलेक्ट्रिशियन (5 जागा), सुतार (4 जागा), प्लंबर (3 जागा), गळवाटदार (10 जागा), ड्रायव्हर (4 जागा) आणि मल्टी टास्क ऑपरेटर (25 जागा) या पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता:

विविध पदांसाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • वित्त आणि लेखा सहाय्यक पदासाठी अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, टॅली, टायपिंग आणि एमएस-सीआयटी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल.
  • निम्न श्रेणी लघुलेखक पदाकरिता कोणत्याही शाखेतील पदवी आणि स्टेनोग्राफी (इंग्रजी आणि मराठी) प्रमाणपत्र आवश्यक आहे, प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य मिळेल.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे.
  • विधी सहाय्यक पदासाठी कायदा शाखेतील पदवी आणि टायपिंग तसेच एमएस-सीआयटी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी आणि टायपिंग तसेच एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • ग्रंथालय सहाय्यक पदाकरिता ग्रंथालय विज्ञान शाखेतील पदवी आणि टायपिंग तसेच एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर आणि मेसन या पदांसाठी संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा आवश्यक आहे.
  • वाहनचालक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि वैध वाहनचालक परवाना असणे गरजेचे आहे.
  • मल्टी टास्‍क ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि टायपिंग तसेच एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

पगार:

या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या पात्र पदवीधर उमेदवारांना दरमहा ₹9,000/- आणि पदविकाधारक उमेदवारांना दरमहा ₹8,000/- वेतन मिळेल. मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरूंना कार्यक्षम उमेदवारांनांचे वेतन वाढवण्याचा अधिकार आहे.

अर्जदारांसाठी वयोमर्यादा:

अप्रेंटिसशिप कायदा, १९७३ च्या नियमांनुसार निश्चित केली जाईल. याचा अर्थ, या पदांसाठी अर्ज करणारा कोणताही उमेदवार अप्रेंटिसशिप कायद्यामध्ये नमूद केलेल्या वयोमर्यादेत बसणारा असावा. विशिष्ट वयोमर्यादेची माहिती अप्रेंटिसशिप कायद्यातील तरतुदीनुसार तपासली जाईल.

निवड प्रक्रिया:

निवड प्रक्रिया अ‍ॅप्रेंटिसशिप (सुधारणा) कायदा १९७३ नुसार निश्चित केली जाईल. यामध्ये अ‍ॅप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी साधारणपणे एक वर्ष असेल. या प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड ही उमेदवारांची मूलभूत पात्रता आणि मुलाखतीतील प्राप्त झालेल्या गुणांच्या एकूण टक्केवारीच्या आधारावर राहील.

हे पण वाचा » केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!

अर्ज कसा करावा?

उमेदवारांना NATS 2.0 (राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना) च्या अधिकृत वेब पोर्टलवर दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यानंतर, मुंबई विद्यापीठाने त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या विविध अप्रेंटिसशिपच्या जागांसाठी याच NATS 2.0 पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी कशी करावी आणि मुंबई विद्यापीठातील अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करावा, याची सविस्तर माहिती जाहिरातीच्या परिशिष्ट-१ मध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परिशिष्ट-१ काळजीपूर्वक वाचावे.

महत्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ मार्च २०२५ पासून सुरू होत आहे. उमेदवारांना त्यांचे अर्ज सादर करण्यासाठी १७ एप्रिल २०२५ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे, ज्या कोणाला या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी दिलेल्या वेळेत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

जर अर्ज अपूर्ण असेल किंवा त्यात कोणतीही चुकीची माहिती नमूद केली असेल, तसेच जर अर्ज विहित मुदतीनंतर प्राप्त झाला, तर अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही आणि ते स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे, अर्जदारांनी अर्ज काळजीपूर्वक आणि वेळेत सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही शंका किंवा स्पष्टीकरणासाठी, उमेदवार hrdc.recruitment@mu.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदे भरायची किंवा नाही, तसेच संपूर्ण जाहिरात बदलण्याचा, सुधारण्याचा अथवा रद्द करण्याचा पूर्ण अधिकार विद्यापीठाकडे राखून ठेवलेला आहे, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा