Advertisement
Clerk and Peon Job Interview

नोकरीची संधी: सिंधुदुर्ग येथे सहकारी पतसंस्थेत लिपिक व शिपाई पदांसाठी थेट मुलाखती!

Clerk and Peon Job Interview: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेसाठी विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विविध पदांसाठी एकूण २० जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये व्यवस्थापक (Manager) पदासाठी ५ जागा, लिपिक (Clerk) पदासाठी १० जागा, आणि शिपाई (Peon) पदासाठी ५ जागा उपलब्ध आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.कॉम. (प्रथम किंवा द्वितीय श्रेणीत) तसेच जी.डी.सी. ॲन्ड ए. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांना संगणकाचे चांगले ज्ञान आणि किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.कॉम. (प्रथम किंवा द्वितीय श्रेणीत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. शिपाई पदासाठी उमेदवाराने किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा » १० ते पदवीधरांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल २४२३ पदांची भरती!

मुलाखतीसाठी महत्त्वाच्या सूचना

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बुधवार, १८ जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता संस्थेच्या फोंडाघाट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील मुख्य कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांनी आपली शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती, त्यांच्या प्रमाणित झेरॉक्स प्रती आणि पगाराच्या अपेक्षेसह परिपूर्ण अर्ज सोबत आणणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा » ‘या’ सरकारी कंपनीत 197 जागांसाठी नोकरीची संधी!

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. संस्थेने वरील पदांमध्ये बदल करण्याचे किंवा आवश्यक उमेदवार न मिळाल्यास भरती प्रक्रिया थांबवण्याचे सर्व अधिकार स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

या भरतीच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी.