Advertisement
Will I get pension after withdrawing PF

पीएफ काढल्यावर पेन्शनचे पैसे मिळेल का? पहा नियम काय सांगतो…

Will I get pension after withdrawing PF: अनेकदा नोकरदार वर्ग निवृत्तीपूर्वी भविष्य निर्वाह निधी (PF) चे पैसे काढतो. अशा वेळी, कर्मचारी पेन्शन योजनेचे (EPS) पैसे मिळतील की नाही, हा प्रश्न त्यांच्या मनात येतो. बऱ्याच लोकांना वाटते की जर पीएफ काढला तर ईपीएस देखील संपतो. मात्र, पीएफ काढल्यानंतर ईपीएस (Employee Pension Scheme) चे काय होते आणि निवृत्तीनंतर त्याचे फायदे मिळतात की नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पीएफ आणि ईपीएस हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत, आणि पीएफ काढल्याने तुमच्या ईपीएसवरील हक्कांवर थेट परिणाम होत नाही, परंतु त्याचे काही नियम आहेत जे जाणून घेणे आवश्यक आहे.

PF आणि EPS मधील फरक

पीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) आणि ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) यांच्यातील फरक तुम्ही किती वर्षे नोकरी केली आहे यावर अवलंबून असतो. जर तुमची नोकरीची मुदत १० वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही ईपीएसचे पैसे एकरकमी काढू शकता. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ) फॉर्म १०सी वापरला जातो, जो पीएफ काढण्याच्या प्रक्रियेसारखाच असतो.

हे पण वाचा » पदवीधरांना नोकरीची संधी; पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत विविध पदांची भरती!

१० वर्षांपेक्षा जास्त नोकरी झाल्यास…

जर तुमची नोकरी १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी असेल, तर तुम्ही कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) अंतर्गत जमा केलेले पैसे काढू शकत नाही. हे पैसे तुमच्या वतीने पेन्शन म्हणून जमा केले जातात आणि तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षी पोहोचल्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित पेन्शन मिळते. जरी तुम्ही तुमचा भविष्य निर्वाह निधी (PF) काढला तरी, तुम्हाला ईपीएसमधून पेन्शन मिळण्याचा अधिकार कायम राहतो.

हे पण वाचा » १० ते पदवीधरांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल २४२३ पदांची भरती!

जर तुम्ही १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ नोकरी केली असेल आणि नंतर पीएफ काढला असेल, तर तुम्ही निवृत्तीनंतर कधीही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) फॉर्म १०डी भरून पेन्शन घेणे सुरू करू शकता. पीएफ काढल्यानंतर ईपीएसमधील तुमची रक्कम पेन्शनच्या स्वरूपात तुम्हाला दिली जाते.