Find your 10 digit DIGIPIN number: आपण कोणालाही आपला पत्ता सांगताना किंवा कुठेही लिहिताना शेवटी पिनकोड सांगतो. सुरुवातीला, जेव्हा पत्रव्यवहाराचा काळ होता, तेव्हा पोस्ट ऑफिससाठी हा पिनकोड (Pin code) अत्यंत महत्त्वाचा ठरत असे. सहा अंकी पिनकोड हा संपूर्ण भागाची ओळख सांगतो, पण एखाद्या कुरियर घेऊन आलेल्या व्यक्तीला तुमचे नेमके घर शोधण्यासाठी तो पुरेसा ठरत नाही.
याच समस्येवर उपाय म्हणून, भारत सरकारच्या डाक विभागाने आता एक नवी डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टिम सुरू केली आहे. यालाच ‘डिजिपिन’ (DIGIPIN) असे नाव देण्यात आले आहे.
DIGIPIN ही भारतीय पोस्ट विभाग, IIT हैदराबाद आणि NRSC यांनी ISRO च्या अंतर्गत संयुक्तपणे विकसित केलेली एक राष्ट्रव्यापी, मुक्त-स्रोत डिजिटल ॲड्रेसिंग प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये, भारताचा संपूर्ण भूभाग अंदाजे ४ मीटर x ४ मीटरच्या ग्रिडमध्ये विभागला जातो. प्रत्येक ग्रीडला एक विशिष्ट १०-अंकी कोड देण्यात आला आहे, जो त्या विशिष्ट जागेचा अचूक डिजिटल पत्ता म्हणून कार्य करतो.
हे पण वाचा » पीएफ काढल्यावर पेन्शनचे पैसे मिळेल का? पहा नियम काय सांगतो…
हा १०-अंकी कोड अक्षांश (latitude) आणि रेखांश (longitude) या भौगोलिक स्थानांवर आधारित आहे. यामुळे, देशातील कोणत्याही गल्ली, खेडेगावातील वा शहरातील अगदी अचूक जागेचा पत्ता शोधण्यासाठी हा कोड अत्यंत उपयुक्त ठरतो.
पारंपारिक पत्ते परिसर, रस्त्यांची नावे आणि घर क्रमांक यांसारख्या माहितीवर अवलंबून असतात, तर डिजिपिन पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करते. डिजिपिन हे एक विशिष्ट १०-अक्षरी अल्फान्यूमेरिक कोड वापरते, ज्यामुळे कोणत्याही विशिष्ट ठिकाणाचे भौगोलिक निर्देशांक अचूकपणे दर्शवले जाते. यामुळे, पारंपारिक पत्त्यांमध्ये आढळणारी संदिग्धता टाळून, डिजिपिन कोणत्याही स्थानाचा अचूक ठावठिकाणा सहजपणे शोधण्यास मदत करते.
हे पण वाचा » १० ते पदवीधरांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल २४२३ पदांची भरती!
DIGIPIN हे कोणत्याही वैयक्तिक माहितीशी जोडलेले नसून, केवळ तुमच्या स्थानाचे अक्षांश (latitude) आणि रेखांश (longitude) वापरून तयार केले जाते. हा कोड फक्त एक स्थान ओळखकर्ता म्हणून काम करतो, त्यामुळे कोणताही वैयक्तिक डेटा यासोबत साठवला जात नाही किंवा त्याला जोडला जात नाही. यामुळे DIGIPIN सुरक्षित आहे.
तुम्हाला तुमचा स्वतःचा डिजिपिन शोधण्यासाठी डिजिपिनच्या अधिकृत वेबसाइट: https://www.mydigipin.com/ वर जावे लागेल. तिथे तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस (GPS) लोकेशन टाकताच, तुम्हाला त्या जागेचा १०-अक्षरी युनिक (unique) डिजिपिन कोड मिळेल. हा कोड तुम्ही डाक सेवा, ई-कॉमर्स डिलिव्हरी, आणि सरकारी सुविधांसाठी वापरू शकता.