पदांचा तपशील आणि पात्रता
पदानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि मानधन याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. उपजीविका सल्लागार
• पदसंख्या: ४०
• शिक्षण आणि अनुभव: उमेदवाराकडे कृषी किंवा पशुसंवर्धन किंवा तत्सम क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. संबंधित कार्यक्षेत्रात कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच, व्हॅल्यू चेन प्रकल्प आखण्याचा आणि राबवण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य मिळेल. MS-CIT किंवा तत्सम डिप्लोमा आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड/एक्सेल वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
• वयोमर्यादा: ४० वर्षांपर्यंत.
• मानधन: प्रतिमाह रु. १५,०००/- पर्यंत (नियमानुसार).
२. लेखापाल
• पदसंख्या: CMRC स्तरावर एकूण ३ पदे (धानोरा १, जिमलगट्टा १, भामरागड १).
• शिक्षण आणि अनुभव: उमेदवाराने B. Com उत्तीर्ण केलेले असावे आणि MS-CIT डिप्लोमा असणे आवश्यक आहे. Tally वापरण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. लेखाविषयक काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
• मानधन: प्रतिमाह रु. ८,०००/- पर्यंत + प्रवास खर्च.
हे पण वाचा » मुंबई विद्यापीठ अंतर्गत तरुणांना 151 जागांसाठी नोकरीची संधी!
३. सहयोगिनी
• पदसंख्या: CMRC स्तरावर एकूण ११ पदे (आरमोरी २, धानोरा १, वैरागड ४, गडचिरोली १, भामरागड १, चामोर्शी १, जिमलगट्टा १) प्रतीक्षा यादीकरिता.
• शिक्षण आणि अनुभव: उमेदवार किमान १२ वी पास असावा. बचत गटात काम करण्याचा किंवा क्षेत्रीय कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
• मानधन: प्रतिमाह रु. ५,०००/- पर्यंत + प्रवास खर्च.
हे पण वाचा » LIC हाऊसिंग फायनान्समध्ये 250 जागांसाठी भरती सुरु!
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सूचना
• अर्जाची अंतिम तारीख: २४ जून २०२५.
• अर्ज सादर करण्याची पद्धत: जाहिरातीत नमूद केलेल्या निकषानुसार पात्र इच्छुक उमेदवारांनी संबंधित सीएमआरसी कडे दिनांक 24/06/2025 पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज करावेत.
• ई-मेलद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
• अनुभव आणि पात्रतेनुसार मानधन ठरवण्याचे तसेच जाहिरातीबाबतचे संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित अध्यक्षा CMRC यांच्याकडे राहतील.
या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी.