Job opportunity at Krishi Vigyan Kendra Yyavatmal

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे 10वी, 12वी पास साठी नोकरीची संधी!

यवतमाळ जिल्ह्यातील सांगवी (रेल्वे) येथील कृषी विज्ञान केंद्र (KVK Yavatmal) येथे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यांच्याद्वारे प्रायोजित आणि नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, दारव्हा यांच्या अंतर्गत ही भरती आयोजित केली जात आहे. उपलब्ध पदांमध्ये स्टेनोग्राफर (ग्रेड III) चे एक पद, ड्रायव्हरचे एक पद, ट्रॅक्टर चालकाचे एक पद आणि सहाय्यक कर्मचारी (ग्रेड-I) ची दोन पदे यांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता:

स्टेनोग्राफर (ग्रेड III) या पदासाठी अर्जदाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच, त्यांची इंग्रजी किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट ८० शब्दांच्या वेगाने १० मिनिटांसाठी डिक्टेशन चाचणी घेतली जाईल. इंग्रजी टंकलेखनासाठी, मॅन्युअलवर ६५ मिनिटे किंवा संगणकावर ५० मिनिटांचा वेळ असेल, तर हिंदी टंकलेखनासाठी संगणकावर ६५ मिनिटांचा वेळ दिला जाईल.

ड्रायव्हर आणि ड्रायव्हर (ट्रॅक्टर) पदांसाठी अर्जदाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्याकडे संबंधित सरकारी प्राधिकरणाने दिलेले वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. या पदासाठी उमेदवारांना व्यावहारिक कौशल्य चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. आयटीआयमधून संबंधित क्षेत्रात एक वर्षाचे ट्रेड प्रमाणपत्र आणि मान्यताप्राप्त संस्थेत ड्रायव्हिंगचा अनुभव तसेच मोटर मेकॅनिक कामाचा अनुभव आवश्यक आहे.

सहाय्यक कर्मचारी (ग्रेड-I) पदासाठी अर्जदाराने मॅट्रिक्युलेशन किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा त्यांच्याकडे आयटीआयचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पगार/वेतन:

स्टेनोग्राफर (ग्रेड III), ड्रायव्हर आणि चालक (ट्रॅक्टर), तसेच सहाय्यक कर्मचारी (ग्रेड-I) या पदांसाठी वेतनश्रेणी ₹५२०० ते ₹२०२०० इतकी आहे.

अर्ज कसा करावा ?

इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा असल्यास, त्यांनी आपले अर्ज नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, जिजामाता गर्ल्स हायस्कूल, आर्णी रोड, दारव्हा, जिल्हा- यवतमाळ, ४४५२०२ या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासून ३० दिवसांपर्यंत असेल. अर्जाचा नमुना, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक माहितीसाठी, उमेदवारांनी www.kvksangvi.com या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा पुढे दिलेल्या अधिकृत जाहिरातीत पाहू शकता.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासून ३० दिवसांपर्यंत असेल. जर, अंतिम तारीख रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आली, तर त्यानंतरचा पहिला कामाचा दिवस अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख म्हणून गणला जाईल. अर्ज पाठवताना होणाऱ्या कोणत्याही पोस्टल विलंबासाठी कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) आणि व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही याची सर्व अर्जदारांनी कृपया नोंद घ्यावी.

अर्जदारासाठी वयोमर्यादा:

स्टेनोग्राफर पदासाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे, तर ड्रायव्हर पदासाठी कमाल ३० वर्षे आणि सहाय्यक कर्मचारी पदासाठी कमाल २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग (पीएच) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

हे पण वाचा » ISRO मधे 10वी पास, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!

महत्वाच्या सूचना:

  • एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
  • एकत्रित अर्ज किंवा एकाच अर्जात अनेक पदांचा उल्लेख केल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • केवळ निवड झालेल्या पात्र उमेदवारांनाच पुढील चाचणी किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता (टीए) किंवा दैनिक भत्ता (डीए) दिला जाणार नाही.
  • स्थानिक भाषेचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • यापूर्वी नोकरी करत असलेल्या अर्जदारांनी त्यांचे अर्ज त्यांच्या सध्याच्या कार्यालयामार्फत ना हरकत प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण भरलेले अर्ज किंवा अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जावर उमेदवाराची सही असणे आवश्यक आहे आणि सोबत जन्मतारखेचा पुरावा, वयात सवलत लागू असल्यास त्याचा पुरावा, आवश्यक शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आणि स्वतःचे साक्षांकित केलेले छायाचित्र जोडावे.
  • तसेच, उमेदवारांनी अर्ज पाठवलेल्या लिफाफ्यावर “……. या पदासाठी अर्ज” असा स्पष्ट उल्लेख करावा.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा