Aditi Tatkare on Majhi Ladaki Bahin Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की, या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची अनेक ‘लाडक्या बहिणीं’ना प्रतीक्षा होती. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून, आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून दिली आहे.
मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. जून महिना सुरू झाला तरी मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नव्हता, त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करून संगितले…
मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये हा सन्मान निधी उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होईल. यामुळे राज्यातील लाखो भगिनींना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) June 4, 2025
अदिती तटकरे यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगिले.
हे पण वाचा » खुशखबर! आता ‘या’ प्रवाशांना टिकीटात मिळणार 15% सूट; MSRTC ने आणली नवीन योजना…
लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा रुपये दिले जातात. या योजनेतील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम मे रोजी मिळाली होती, त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आतापर्यंत अकराव्या हप्त्याच्या रकमेसह, योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींना एकूण रुपये मिळाले आहेत. काही महिन्यांमध्ये, लाडक्या बहिणींना दोन महिन्यांची रक्कम एकत्रितपणे देण्यात आली होती, जसे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्र मिळाली होती.
या महिलांना फक्त 500 रुपये मिळणार!
‘माझी लाडकी बहीण’ या सरकारी योजनेअंतर्गत महिलांना साधारणपणे १५०० रुपये दिले जातात. मात्र, ज्या महिला शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना (Namo Shetkari Sanman Nidhi Yojana) या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपयांची रक्कम दिली जाते. या महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासह आतापर्यंत एकूण ११ हप्त्यांची रक्कम मिळाली आहे.
हे पण वाचा » चुकवू नका! आधार वरील माहिती मोफत अपडेट करण्याची ही शेवटची संधी!
बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का?
तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वप्रथम, जर पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस (SMS) प्राप्त होईल. हा सर्वात सोपा मार्ग आहे.
जर तुम्हाला बँकेकडून एसएमएस आला नसेल, तर तुम्ही तुमच्या बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर SMS पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत क्रमांकांची माहिती असणे आवश्यक आहे.
आजकाल स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी बँक बॅलन्स तपासणे खूप सोपे झाले आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन असल्यास आणि तुम्ही नेट बँकिंग, गुगल पे (Google Pay) किंवा फोन पे (PhonePe) यांसारख्या ॲप्सचा वापर करत असाल, तर तुम्ही घरबसल्या तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता.
याशिवाय, तुमच्याकडे डेबिट कार्ड असल्यास, तुम्ही कोणत्याही एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री (Last Transaction History) तपासून पाहू शकता. यामुळे तुमच्या खात्यात झालेले शेवटचे व्यवहार दिसतील आणि पैसे जमा झाले आहेत की नाही हे कळेल.
सर्वात पारंपरिक आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे बँकेत प्रत्यक्ष भेट देणे. तुम्ही तुमच्या शाखेतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची चौकशी करू शकता.