नागपूरमध्ये क्लर्क, लॅब अटेंडंट, वॉचमन आणि इतर पदांसाठी भरती! जाणून घ्या अर्ज…

Air Force School Nagpur recruitment 2025: एअर फोर्स स्कूल, वायुसेना नगर, नागपूर (Air Force School, Nagpur) येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये क्लर्क, लॅब अटेंडंट, आणि वॉचमन (पुरुष), पीजीटी, टीजीटी, पीआरटी, एनटीटी या पदांचा समावेश आहे. एकूण १२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने १६ जून २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

एअर फोर्स स्कूल नागपूर भरती २०२५

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर हे असेल. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी आपले अर्ज वायुसेना शाळा, वायुसेना नगर, नागपूर-440007 या पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी, आपण www.airforceschoolvsnnagpur.org या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करण्याचा ईमेल पत्ता afschoolrecruitment@gmail.com आहे.

अर्ज प्रक्रिया

इच्छुक आणि पात्र उमेदवार शाळेच्या अधिकृत वेबसाइट www.airforceschoolvsnnagpur.org ला भेट देऊन वयाची अट, पात्रता, वेतन आणि इतर तपशील तपासू शकतात. अर्ज शाळेच्या वेबसाइटवरून डाउनलोड करायचा आहे. जर उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

afschoolrecruitment@gmail.com या ईमेल द्वारे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, त्याची हार्ड कॉपी आणि सेल्फ-अटेस्टेड कागदपत्रे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत “एअर फोर्स स्कूल व्हीएसएन नागपूर – 440007” या पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवावीत. शाळेच्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या बॉक्समध्ये देखील अर्ज टाकता येऊ शकतो.

निवड प्रक्रिया:

निवडीची तारीख आणि संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला ईमेलद्वारे किंवा तुम्ही अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर कळवली जाईल. निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याकरिता कोणताही प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर, तुम्ही सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत ०७१२-२५११४०७ किंवा ९१४६०७१४८७ या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.

अधिकृत जाहिरात

या भरतीचा ऑनलाईन/ऑफलाइन अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी अधिक माहितीसाठी एअर फोर्स स्कूल, नागपूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.