ठाणे येथील बी.एन.एन. कॉलेज येथे विविध ७७ पदांसाठी नोकरीची संधी!

B.N.N. College Bhiwandi Recruitment 2025: बी.एन.एन. कॉलेज (कला, विज्ञान आणि वाणिज्य), भिवंडी, जि. ठाणे यांनी सहाय्यक शिक्षक, सहाय्यक प्राध्यापक, अभ्यागत सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल, कनिष्ठ लिपिक, शिपाई, ग्रंथपाल, आणि सहाय्यक ग्रंथपाल या पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 77 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

या पदांच्या भरतीसाठी बी. एन. एन. कॉलेज यांनी दिनांक 23, 24 आणि 25 जून 2025 रोजी मुलाखती आयोजित केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असल्यामुळे अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंक वरील अधिकृत जाहिरात वाचावी. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण भिवंडी, जि. ठाणे हे आहे.

या भरतीचा अर्ज पाठविण्यासाठी पत्ता “सचिव, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, धामणकर नाका, वऱ्हाळदेवी रोड, भिवंडी, जि. ठाणे ४२१३०५”असा आहे.

हे पण वाचा » उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी!

अर्ज करण्यापूर्वी भरतीचे अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा. या भरतीसाठी या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही बी. एन. एन. कॉलेज ठाणे यांच्या अधिकृत वेबसाईट: https://www.bnncollege.in/ वर भेट देऊ शकता.