Bharti Vidyapeeth Pune Bharti 2025: पुण्यातील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयामध्ये २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी वरिष्ठ विभागात (Senior College) विविध विषयांसाठी तासिका तत्वावर (CHB) शिक्षक पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
या भरतीसाठी मंगळवार, दि. १७ जून २०२५ रोजी मुलाखती होणार आहे. उमेदवारांनी सकाळी १०:०० ते १०:३० पर्यंत आपली उपस्थिती नोंदवावी. मुलाखती सकाळी १०:३० वाजता सुरू होतील.
मुलाखतीचे ठिकाण भारती विद्यापीठ भवन, ८ वा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, पुणे – ४११०३०, असे आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपला अर्ज, सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती आणणे अनिवार्य आहे.
या भरती अंतर्गत, सूक्ष्मजीवशास्त्र विषयात सर्वाधिक १० जागा असून वनस्पतीशास्त्र विषयासाठी ०४ पदे उपलब्ध आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि प्राणीशास्त्र या प्रत्येक विषयात प्रत्येकी ०२ पदे रिक्त आहेत.
हे पण वाचा » कर्मचारी निवड आयोग मार्फत तब्बल १४५८२ जागांची मेगा भरती; अर्ज सुरू…
संख्याशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्रत्येकी ०१ पद उपलब्ध आहे. वाणिज्य विषयात एकूण ०५ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार संबंधित विषयासाठी रिक्त असलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी व शर्तींबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://ymc.bharatividyapeeth.edu या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
हे पण वाचा » नागपूरमध्ये क्लर्क, लॅब अटेंडंट, वॉचमन आणि इतर पदांसाठी भरती! जाणून घ्या अर्ज…
या भरतीच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात आवर्जून वाचा अधिक माहितीसाठी भारतीय विद्यापीठ पुणे यांच्या संकेतस्थळावर: https://www.bvuniversity.edu.in/ymc/ भेट द्या.

My name is Manish Mule. I have been writing blog articles for the last four years. I have a good experience in this work. Currently I am working as a digital content producer for Kolgaonlive.in web portal.