Big recruitment in Maharashtra Forest Department

लागा तयारीला!! महाराष्ट्र वन विभागात होणार 12991 जागांची भरती!

Government Job: महाराष्ट्र वन विभागामार्फत लवकरच वनरक्षक पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये तब्बल १२,९४९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये नागपूर विभागात सर्वाधिक १६५२ जागा, लाखांदूर वनविभागात १५८ जागा आणि नाशिक विभागात ८८७ जागांचा समावेश असेल. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

राज्याचे विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वन विभागातील या मोठ्या भरतीला हिरवा कंदील मिळाला असून, याबाबत भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, तर काही विशिष्ट पदांसाठी अतिरिक्त पात्रता देखील लागू होऊ शकते. अर्जदारांकडे बोर्डाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.

विभागानुसार जागांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:

नाशिक विभागात ८८७ जागा, छत्रपती संभाजीनगर विभागात ६३१ जागा, नागपूर विभागात १६५२ जागा, चंद्रपूर विभागात ८४९ जागा, गडचिरोली विभागात १४४८ जागा, अमरावती विभागात २१२८ जागा, यवतमाळ विभागात ६६५ जागा, पुणे विभागात १०९८ जागा, कोल्हापूर विभागात ९२६ जागा, धुळे विभागात १३१ जागा, ठाणे विभागात ९६८ जागा आणि रायगड विभागात १२,१९९ जागा उपलब्ध आहेत.

वनरक्षक पदांव्यतिरिक्त, भविष्यात येणाऱ्या भरतीमध्ये कारकून, शिपाई, मशीनमन, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर आणि रखवालदार यांसारख्या अन्य पदांचाही समावेश असण्याची शक्यता आहे, वनविभागातील खाजगी सूत्रांनी वर्तवली आहे. या भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्जाचे वेळापत्रक

वनरक्षक आणि इतर सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. भरतीचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नसले तरी, ते लवकरच वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होण्याची शक्यता खासगी कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी वनविभागाच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहण्याचे आवाहन या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.

शारीरिक चाचणीच्या दृष्टीने, पुरुष उमेदवारांसाठी ५ किलोमीटर धावण्याची आणि महिला उमेदवारांसाठी ३ किलोमीटर धावण्याची अट असणार आहे. त्यामुळे, या चाचणीसाठी उमेदवारांनी नियमित सराव करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.