सेंट्रल बँकेत ४५०० पदांसाठी भरती: पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!

CBI 4500 apprentice recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांनी अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी एकूण ४५०० जागांची भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी २३ जून २०२५ या अंतिम तारखेपूर्वी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार बँकेने दिलेल्या लिंकवर आपले अर्ज करू शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4500 पदांची भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस पदांसाठी एकूण 4500 जागांची भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असेल, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पदांसाठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून, अर्ज शुल्क PWBD उमेदवारांसाठी 400 रुपये, SC/ ST/ सर्व महिला/ EWS उमेदवारांसाठी 600 रुपये आणि इतर उमेदवारांसाठी 800 रुपये आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 आहे.

हे पण वाचा » पदवीधरांना, पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत नोकरीची संधी!

या पदासाठी मासिक वेतन श्रेणी 15000/- रुपये देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट https://www.centralbankofindia.co.in/ ला भेट द्या.

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ग्रॅज्युएशन) असणे आवश्यक आहे. किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणतीही समकक्ष शैक्षणिक पात्रता असल्यास अर्ज करू शकतात.

हे पण वाचा » १०वी ते पदवीधरांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल २४२३ पदांची भरती!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत असलेल्या अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.