District Court Chandrapur Recruitment 2025: जिल्हा न्यायालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर ‘सफाईगार’ पदांसाठी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया २०२५ करिता असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तपशिलानुसार अर्ज करावेत. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर एस-१ (रु. १५,०००-४७,६००) या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १०/०६/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे. अर्जदारांनी आपला अर्ज “प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टँड समोर, चंद्रपूर – ४४२ ४०१” या पत्त्यावर पाठवावा. अर्ज फक्त Speed Post द्वारे स्वीकारले जातील. साध्या पोस्टद्वारे, कुरियरद्वारे किंवा समक्ष (By hand) सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच, अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे असून कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे. अनुसूचित जाती (अ.जा.), अनुसूचित जमाती (अ.ज.), इतर मागासवर्गीय (इ.मा.व.), विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (वि.जा.न.ज.), इतर मागासवर्गीय/भटके जमाती (इ.मा.व./भ.ज.), तसेच विशेष मागास प्रवर्ग (वि.मा.प्र.) इत्यादींसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे असून कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे.
हे पण वाचा » 136 पदांसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे नोकरीची संधी!
पात्रता निकष:
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. उमेदवाराने किमान इयत्ता सातवी उत्तीर्ण केलेली असावी. जर उमेदवाराकडे सातवी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक उपलब्ध नसेल, तर त्याने अर्जामध्ये सातवीसाठी ५०% अंदाजे गुण (उदा. एकूण १०० पैकी ५० गुण) नमूद करावेत. तसेच, जर उमेदवाराकडे दहावी, बारावी किंवा पदवीसारखी उच्च शैक्षणिक अर्हता असेल, तर ती अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे.
शारीरिक क्षमतेबाबत, उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असणे आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक आहे. ज्या उमेदवारांना शासकीय कार्यालय किंवा न्यायालयात यापूर्वी काम केल्याचा अनुभव असेल, त्यांना या पदासाठी प्राधान्य दिले जाईल.
अटी व शर्ती
उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. तो करार करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. उमेदवाराला कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC किंवा इतर कोणत्याही राज्य सेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षांमधून कायमचे काढून टाकलेले किंवा अपात्र ठरवलेले नसावे. तसेच, उमेदवाराला नैतिक अधःपतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे.
त्याच्याविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा. उमेदवाराला हयात असलेल्या पत्नी किंवा पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, अर्ज करण्याच्या दिनांकास २८ मार्च २००५ व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.
हे पण वाचा » आठवी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांची भरती सुरू!
अर्जाचे शुल्क
सर्व प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. ३००/- (रुपये तीनशे मात्र) असेल. हे शुल्क “DISTRICT JUDGE-1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE, CHANDRAPUR” यांच्या नावाने काढलेल्या डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) स्वरूपात जमा करावे लागेल. अर्ज शुल्क भरल्याशिवाय कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही.