ECIL अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! 1,40,000/- हजार पगार…

ECIL Recruitment 2025: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) मध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee) पदाच्या एकूण ८० जागांसाठी भरती होत आहे. यासाठी इच्छुक उमेदवार १६ मे २०२५ ते ५ जून २०२५ या कालावधीत ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ वर्षांपर्यंत असावे.

ECIL भरती 2025

ECIL ने त्यांच्या www.ecil.co.in या अधिकृत वेबसाइटवर ECIL पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी भरती २०२५ ची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेत नोंदणीच्या तारखा, पात्रता निकष, शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक माहिती नमूद केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचना पाहू शकतात.

निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे

उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित चाचणी (Computer-based Test) आणि मुलाखत (Interview) या दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना रु. ४०,००० ते १,४०,००० पर्यंत वेतन मिळेल. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कंपनीची अधिकृत वेबसाईट www.ecil.co.in ला भेट देऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने नमूद केलेले सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र असतील.

हे पण वाचा » थेट मुलाखतीद्वारे, ग्रंथपाल, कॉम्प्युटर ऑपरेटर पदांची भरती

अर्जदारासाठी वयोमर्यादा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वय २६ एप्रिल २०२५ रोजी २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. प्रवर्गानुसार वयोमर्यादेतील सवलत खालीलप्रमाणे आहे:

प्रवर्ग वयोमर्यादा सवलत
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) ५ वर्षे
इतर मागासवर्गीय (OBC – NCL) ३ वर्षे
दिव्यांग व्यक्ती (PwD) (≥४०% दिव्यांगत्व) १० वर्षे
जम्मू आणि काश्मीरचे अधिवासी (०१/०१/१९८० ते ३१/१२/१९८९ दरम्यान) ५ वर्षे
माजी सैनिक संरक्षण सेवेतील कालावधी + ३ वर्षे

अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज

ईसीआयएल (ECIL) पदवीधर प्रशिक्षणार्थी भरती २०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी ECIL यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.