Eighth Pay Commission Fitment Factor 2025: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपत असल्यामुळे, आगामी वर्षात आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल आणि ‘फिटमेंट फॅक्टर’ (Fitment Factor) म्हणजे काय, याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया.
कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ?
सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि अंदाजानुसार, जर आठवा वेतन आयोग लागू झाला, तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात (minimum wage) लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याचा विचार सुरू आहे. हा फिटमेंट फॅक्टर जर वाढवण्यात आला, तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट २६,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. यापूर्वी, जेव्हा सातवा वेतन आयोग लागू झाला होता, तेव्हा फिटमेंट फॅक्टर २.५७ पट ठेवण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात १४.२९ टक्क्यांनी वाढ झाली होती आणि किमान वेतन १८,००० रुपये झाले होते. आता आठव्या वेतन आयोगाकडून याहून अधिक वाढ अपेक्षित आहे.
हे पण वाचा » पुणे महानगरपालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी; 80,000/- पर्यंत मिळेल पगार!
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन (Basic Pay) ठरवण्यासाठी हा वापरला जातो. वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, कर्मचाऱ्यांचे जुने मूळ वेतन आणि ग्रेड पे (Grade Pay) एकत्र करून, त्या एकूण रकमेला विशिष्ट फिटमेंट फॅक्टरने गुणाकार केला जातो.
उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे जुने मूळ वेतन १०,००० रुपये असेल आणि त्यावर २.५७ हा फिटमेंट फॅक्टर लावला, तर त्याचे नवीन वेतन २५,७०० रुपये होईल. हा फॅक्टर लागू केल्यामुळे वेतनात पारदर्शकता येऊन सर्व कर्मचाऱ्यांना समान प्रमाणात वेतनवाढ दिली जाते. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर हा वेतनवाढीतला एक महत्त्वाचा घटक मानला जातो.
हे पण वाचा » नाशिक येथे थेट मुलाखतीद्वारे 269 जागांसाठी विविध पदांची भरती
सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा १.८६ पट निश्चित करण्यात आला होता. यानुसार, कर्मचाऱ्यांच्या आधीच्या मूळ वेतनाला १.८६ ने गुणून नवीन वेतनश्रेणी ठरवण्यात आली. यानंतर लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाने (7th Pay Commission) फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली होती. सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर २.५७ पट ठेवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी मोठी वाढ झाली.
आता, जर आठवा वेतन आयोग लागू झाला, तर स्वाभाविकपणे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये होणारी ही वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी भर टाकेल, अशी अपेक्षा आहे.
हे पण वाचा » हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत 10 पास उमेदवारांना नोकरीची संधी!