आता PF चे पैसे थेट ATM मधून काढू शकाल; EPFO ने सदस्यांसाठी केले महत्त्वपूर्ण बदल!

EPFO 3.0 new features: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांनी मे-जून २०२५ दरम्यान त्यांचे अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म EPFO ३.० लाँच करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे. याचा उद्देश ९ कोटींहून अधिक EPF खातेधारकांना अधिक चांगल्या, जलद आणि पारदर्शक सेवा पुरवणे हा आहे. आधुनिक आयटी पायाभूत सुविधांनी युक्त असलेला हा नवीन प्लॅटफॉर्म अनेक नवीन वैशिष्ट्यपूर्ण आहे.

EPFO ३.० मध्ये मिळणार या नवीन सुविधा:

या नवीन सुविधेमुळे EPF सदस्य आता त्यांचे दावे मंजूर झाल्यानंतर थेट एटीएममधून निधी काढू शकतील, जसे की सामान्य बँक व्यवहारांमध्ये होते. यामुळे निधी मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होईल.
दाव्यांची प्रक्रिया आता स्वयंचलित प्रणालीद्वारे केली जाईल. यामुळे मॅन्युअल प्रक्रियेची गरज कमी होईल आणि दाव्यांचा निपटारा जलद गतीने होईल.

हे पण वाचा » सरकारी कर्मचाऱ्यांना २% महागाई भत्ता वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय!
खातेधारकांना त्यांचे नाव, जन्मतारीख यांसारखे खाते तपशील आता ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा मिळेल. यामुळे कागदपत्रे जमा करण्याची वेळखाऊ प्रक्रिया पूर्णपणे बंद होईल.
पारंपरिक फॉर्म-आधारित पडताळणीऐवजी ओटीपी-आधारित पडताळणीची सुरुवात केली जाईल. यामुळे सदस्यता प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल.
नवीन प्लॅटफॉर्ममध्ये अधिक चांगल्या आणि जलद तक्रार निवारण प्रक्रियेची सोय असेल, ज्यामुळे खातेधारकांच्या समस्या लवकर सोडवण्यास मदत होईल.
EPFO चे उद्दिष्ट अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री जीवन विमा योजना यांसारख्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांना एकत्रित करण्याचे आहे. याचा फायदा असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगारांना होईल.