छत्रपती संभाजीनगर येथे ‘गट-ड’ पदांच्या 357 जागांसाठी नोकरीची संधी!

GMC Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (Government Medical College, Aurangabad) यांनी विविध पदांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि समकक्ष पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ३५७ रिक्त जागा भरण्यात येणार असून, नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर हे असेल.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ०५ जून २०२५ रोजी सुरू होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले ऑनलाइन अर्ज करावेत. यामध्ये आया, माळी, प्रयोगशाळा परिचर, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, आणि नाभिक यांसारख्या पदांचा समावेश आहे.

यामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांसाठी सर्वाधिक ३१५ जागा आहेत. आया या पदासाठी २ जागा आहेत, तर माळी या पदासाठी ११ जागा राखीव आहेत. प्रयोगशाळा परिचर पदासाठी १८ जागा उपलब्ध आहेत. दाया आणि बॉयलर चालक या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी १ जागा आहे. पाणक्या पदासाठी देखील १ जागा भरावयाची आहे. ड्रेसर पदासाठी २ जागा आहेत, तर नाभिक या पदासाठी ६ जागा उपलब्ध आहेत.

हे पण वाचा » नाशिक येथे थेट मुलाखतीद्वारे 269 जागांसाठी विविध पदांची भरती

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा, खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय ३८ वर्षे आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे.

चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांसाठी उमेदवारांना ₹१५,०००/- ते ₹४७,६००/- पर्यंतची वेतनश्रेणी लागू असेल. यामध्ये आया, माळी, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर आणि नाभिक या पदांचा समावेश आहे. प्रयोगशाळा परिचर या पदासाठी वेतनश्रेणी ₹१५,०००/- ते ₹६३,२००/- पर्यंत आहे.

हे पण वाचा » पदवीधरांना नोकरीची संधी; पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत विविध पदांची भरती!

अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. खुला प्रवर्गातील उमेदवारांना १०००/- रुपये शुल्क भरावे लागेल, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९००/- रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

अर्ज प्रक्रिया ०५ जून २०२५ रोजी सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी http://www.gmcaurangabad.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा.

हे पण वाचा » लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र 3000/- येणार? पहा कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता…

या भरतीचा ऑनलाईन अर्ज (५ जून २०२५ पासून) करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.