FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) यांनी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. संस्थेने संचालक, संयुक्त संचालक, वरिष्ठ व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी), व्यवस्थापक, व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक संचालक (ओएल), प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खाजगी सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) आणि सहाय्यक यांसारख्या पदांच्या bhartiची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरती अंतर्गत एकूण ३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांची भारतात कुठेही सेवा करण्याची तयारी आहे, ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्जाची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ पूर्वी त्यांचे अर्ज करू शकतात.
पदानुसार भरावयाच्या जागा
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून, या भरती अंतर्गत संचालक (२ पदे), सहसंचालक (३ पदे), वरिष्ठ व्यवस्थापक (१ पद), वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी) (१ पद), व्यवस्थापक (२ पदे), व्यवस्थापक (आयटी) (२ पदे), सहाय्यक संचालक (ओएल) (१ पद), प्रशासकीय अधिकारी (१० पदे), वरिष्ठ खाजगी सचिव (४ पदे), सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) (१ पद) आणि सहाय्यक (६ पदे) अशा विविध पदांचा समावेश आहे.
पदांनुसार आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- संचालक आणि संयुक्त संचालक पदासाठी पदवी आवश्यक आहे.
- वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी धारक असणे गरजेचे आहे.
- वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी) पदाकरिता पदवी, बीई/ बी.टेक किंवा एमई/ एम.टेक किंवा एमसीए आवश्यक आहे.
- व्यवस्थापक पदासाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/ पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे.
- व्यवस्थापक (आयटी) पदाकरिता बीई/ बी.टेक किंवा एमई/ एम.टेक ही पात्रता आहे.
- सहाय्यक संचालक (OL) पदासाठी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
- प्रशासकीय अधिकारी पदासाठी पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
- वरिष्ठ खाजगी सचिव पदासाठी पात्रता नियमांनुसार असेल.
- सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) पदाकरिता बीई/ बी.टेक किंवा एमई/ एम.टेक किंवा एमसीए उत्तीर्ण आवश्यक आहे.
- सहाय्यक पदासाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदानुसार वेतन:
- संचालक − रु. १२३१०० ते २१५९००/-
- सहसंचालक − रु. ७८,८०० ते २,०९,२००/-
- वरिष्ठ व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक (IT) व्यवस्थापक − रु. ६७,७०० ते २,०८,७००/-
- व्यवस्थापक (IT) आणि सहाय्यक संचालक (OL): रु. ५६,१०० ते १,७७,५००/-
- प्रशासकीय अधिकारी − रु. ४७,६०० ते १,५१,१००/-
- वरिष्ठ खाजगी सचिव आणि सहाय्यक व्यवस्थापक (IT) − रु. ४४,९०० ते १,४२,४००/-
- सहाय्यक − रु. ३५,४०० ते १,१२,४००/-
अर्ज कसा करावा
पात्रता निकष पूर्ण करणारे आणि आवश्यक अनुभव असलेले इच्छुक अर्जदार FSSAI च्या www.fssai.gov.in या वेबसाइटवरील ‘jobs@fssai(careers)’ या टॅबअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या लिंकद्वारे १५ एप्रिल २०२५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, प्रमाणित केलेली अर्जाची हार्ड कॉपी, विहित नमुन्यातील प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे “सहाय्यक संचालक, भरती कक्ष, एफएसएसएआय मुख्यालय, नवी दिल्ली” येथे १५ मे २०२५ पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठविणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असेल.
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |