केंद्रीय रस्ते संशोधन संस्था, नवी दिल्ली (CSIR-CRRI) यांनी कनिष्ठ टंकलेखक आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, संस्थेत एकूण 209 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 आहे. या भरती प्रक्रिया संबंधीत अधिक माहिती जसे की पात्रता निकष, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाच्या तारखा आपण या लेखातून जाणून घेऊ.
अधिकृत जाहिरात क्र. CRRI/02/PC/JSA-JST/2025 नुसार कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या पदासाठी एकूण १७७ तसेच, कनिष्ठ टंकलेखक या पदासाठी ३२ जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदासाठी अर्जदारांनी १०+२/बारावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि डीओपीटीने निश्चित केलेल्या मानकानुसार त्यांची संगणक टंकलेखन गती क्षमता चांगली असावी. कनिष्ठ टंकलेखक पदाकरिता अर्जदारांनी १०+२/बारावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच त्यांची टंकलेखनातील प्रवीणता डीओपीटीच्या निकषांनुसार असावी.
वयोमर्यादा:
सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. तर, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय (OBC-NCL) उमेदवारांसाठी ३ वर्षांची वयोमर्यादेत सूट आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग (PwBD) उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार वयोमर्यादेत विशेष सूट मिळते. अनारक्षित PwBD उमेदवारांना १० वर्षे, SC/ST PwBD उमेदवारांना १५ वर्षे आणि OBC-NCL PwBD उमेदवारांना १३ वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क:
अनारक्षित (UR), ओबीसी (OBC), आणि ईडब्ल्यूएस (EWS) श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५००/- रुपये आहे. तसेच महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग व्यक्ती (PwBD), आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल आणि यासाठी यूपीआय (UPI), नेट बँकिंग (Net Banking) किंवा क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करता येऊ शकतो.
वेतन/पगार:
कनिष्ठ टंकलेखक पदासाठी वेतनश्रेणी दरमहा ₹25,500 ते ₹81,100 आहे, तर कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदासाठी वेतनश्रेणी दरमहा ₹19,900 ते ₹63,200 आहे.
निवड प्रक्रिया:
कनिष्ठ टंकलेखक पदासाठी उमेदवारांची निवड स्पर्धात्मक लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारावर तसेच टंकलेखणातील त्यांच्या प्रवीणता चाचणीच्या आधारावर अवलंबून असेल. त्याचप्रमाणे, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदासाठी उमेदवारांची निवड स्पर्धात्मक लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार आणि संगणक टायपिंगमधील त्यांच्या प्रवीणता चाचणी वर आधारित असेल.
परीक्षेचे स्वरूप:
कनिष्ठ टंकलेखक पदासाठी संगणक आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यात इंग्रजी (इंग्रजी भाषा विभाग वगळता) आणि हिंदीमध्ये प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क (५० प्रश्न, ५० गुण), सामान्य जागरूकता (५० प्रश्न, ५० गुण) आणि इंग्रजी भाषा आणि आकलन (१०० प्रश्न, १०० गुण) असे तीन भाग असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे नकारात्मक गुणदान (negative marking) असेल.
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदासाठी दोन लेखी पेपर असतील. पेपर १ मध्ये मानसिक क्षमता चाचणी (१०० प्रश्न, २०० गुण) असेल आणि पेपर २ मध्ये सामान्य जागरूकता (५० प्रश्न, १५० गुण) आणि इंग्रजी भाषा (५० प्रश्न, १५० गुण) यांचा समावेश असेल. पेपर १ मध्ये नकारात्मक गुणदान नसेल, परंतु पेपर २ मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. याव्यतिरिक्त, या पदासाठी संगणक प्रवीणता चाचणी देखील घेतली जाईल, ज्यात इंग्रजी टायपिंगसाठी ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंगसाठी ३० शब्द प्रति मिनिटाची गती आवश्यक असेल.
हे पण वाचा » भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 पदांची भरती; १,४०,००० पर्यंत मिळेल पगार!
महत्त्वाच्या तारखा:
तपशील | तारीख |
---|---|
ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात तारीख | २२/०३/२०२५ (सकाळी १०:०० पासून) |
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | २१/०४/२०२५ (सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत) |
लेखी परीक्षेची तारीख (संगणक आधारित चाचणी) | मे/जून २०२५ मध्ये |
संगणक/स्टेनोग्राफीमधील प्रवीणता चाचणीची तारीख | जून २०२५ मध्ये |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेले सर्व पात्रता निकष काळजीपूर्वक वाचून घ्यावेत. ऑनलाइन अर्ज भरताना अचूक आणि संपूर्ण माहिती नमूद करावी, कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. अर्जासोबत आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या स्पष्ट स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करायच्या आहेत, ज्यामध्ये वयाचा पुरावा, आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, जात/श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि इतर संबंधित कागदपत्रांचा समावेश होतो. अपूर्ण माहिती किंवा अस्पष्ट कागदपत्रे सादर केल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |