जनसेवा अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत शाखाधिकारी, क्लार्क आणि शिपाई पदांची भरती

जनसेवा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगली येथे शाखा अधिकारी, लिपिक आणि शिपाई या पदांच्या एकूण २० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १७ आणि २२ एप्रिल २०२५ रोजी संस्थेच्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. या भरती संबंधित अधिक माहिती आपण जाणून घेऊ.

जनसेवा अर्बन येथे नोकरीची संधी!

जनसेवा अर्बन येथे शाखाधिकारी, क्लार्क आणि शिपाई या पदांसाठी एकूण २० जागांची भरती होणार आहे. नोकरीचे ठिकाण सांगली असून, निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होईल. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी जनसेवा अर्बन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विटा किंवा जनसेवा अर्बन व शरद मल्टिस्टेट, जोशी गल्ली, तासगाव या पत्त्यांवर १७ आणि २२ एप्रिल २०२५ रोजी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संस्थेची अधिकृत वेबसाईट https://www.jansevaurban.com/ ला भेट द्यावी.

पदानुसार रिक्त जागा

या भरती अंतर्गत शाखाधिकारी या पदासाठी एकूण ०५ जागा रिक्त आहेत, तर क्लार्क आणि शिपाई पदासाठी अनुक्रमे १० जागा आणि 5 जागा उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता

शाखाधिकारी पदासाठी उमेदवाराकडे एम.कॉम. किंवा बी. कॉम. ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, बँकिंग किंवा पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

क्लार्क पदाकरिता देखील बी. कॉम. पदवी आणि बँकिंग/पतसंस्था क्षेत्रातील कामाचा अनुभव तसेच संगणक प्रशिक्षण अनिवार्य आहे. शिपाई पदासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, या पदाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येईल.

या शाखांमध्ये होणार भरती

17 शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनसेवा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये रिक्त पदांची भरती होत आहे. शाखा माधवनगर, तासगाव, भवानीनगर, आष्टा, भिवघाट, सावर्डे, विटा, रामानंदनगर, पलूस, माळवाडी या शाखांमधील पदे भरणे आहेत.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment