जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे नोकरीची संधी! 65,000/- मिळेल पगार…

Job opportunity in collector office Beed: जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्याकडून ‘जिल्हाधिकारी फेलो’ या पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना बीड येथे नियुक्त केले जाईल.

जिल्हाधिकारी कार्यालय बीड भरती २०२५ साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १० जून २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज ऑनलाइन भरावेत.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे MA, M.Sc., MSW, M.Tech. किंवा MBA यापैकी कोणतीही एक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56,000/- रुपये मूळ वेतन आणि 9,000/- रुपये प्रवास भत्ता (TA), असे एकूण 65,000/- रुपये वेतन मिळेल.

हे पण वाचा » छत्रपती संभाजीनगर येथे ‘गट-ड’ पदांच्या 357 जागांसाठी नोकरीची संधी!

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया https://beed.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.