Job opportunity in Dr. PDKV

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ७ वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी!

Government Job: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये प्रयोगशाळा परिचर, परिचर, ग्रंथालय परिचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजूर यांसारख्या एकूण ५२९ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल २०२५ असून, ऑनलाईन अर्जाची लिंक १० मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.

या भरती प्रक्रियेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत निर्देशानुसार केली जात आहे. शासनाने याबाबत दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय क्रमांक कृषी-३७२३/पी.के.१६९/६- निर्गमित केला असून, त्यानुसार ही भरती केली जात आहे.

पदानुसार रिक्त जागा पुढीलप्रमाणे आहेत

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदांसाठी भरती केली जात आहे. त्यानुसार, प्रयोगशाळा परिचर या पदासाठी एकूण ३९ जागा उपलब्ध आहेत, तर परिचर पदासाठी सर्वाधिक ८० जागा भरल्या जाणार आहेत. यासोबतच, चौकीदार पदासाठी ५० जागा, ग्रंथालय परिचर पदासाठी ०५ जागा, माळी पदासाठी ०८ जागा, आणि मजूर या पदासाठी मोठ्या संख्येने म्हणजे ३४४ जागा उपलब्ध आहेत. तसेच, व्हॉलमन पदासाठी ०२ जागा आणि मत्स्यसहायक पदासाठी ०१ जागा भरण्यात येणार आहेत.

पदानुसार शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नमूद करण्यात आली आहे. प्रयोगशाळा परिचर, परिचर, ग्रंथालय परिचर आणि व्हॉलमन या पदांसाठी उमेदवारांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. चौकीदार पदाकरिता उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

माळी पदासाठी कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचे एक वर्षाचे माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. मजूर पदासाठी इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे गरजेचे असून संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, मत्स्यसहायक पदासाठी इयत्ता ४ थी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

अर्जदारांसाठी वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे राहील. माजी सैनिक असल्यास, त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे अधिक सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी + ०३ वर्षे इतकी असेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे अधिक सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी + ०३ वर्षे असेल.

दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आणि पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे असेल. वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक (एस.एस.सी.) शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

अर्ज कसा करावा?

ऑनलाईन अर्ज/आवेदन पत्र व परीक्षा/भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची लिंक १० मार्च, २०२५ पासून सुरु झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक २५ एप्रिल, २०२५ आहे. पात्र उमेदवारांनी विद्यापीठाच्या www.pdkv.ac.in या संकेतस्थळावरील खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.

या पदांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील; इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी संपूर्ण जाहिराती वाचूनच अर्ज भरावा. भरलेला अर्ज Submit केल्यानंतर तयाची अर्जाची प्रिंटआउट नक्की काढावी.

अर्ज शुक्ल आणि पगार

परीक्षा/भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शुल्क अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ५००/- रुपये आहे. मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बळ घटक/अनाथ या प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क २५०/- रुपये आहे. पदांनुसार वेतनश्रेणी रु. १५,००० – रु. ४७,६०० पासून ते रु. १९,९०० – रु. ६३,२०० पर्यंत देण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा