Job opportunity in Nashik: महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक येथे शिक्षक पदांच्या एकूण २६९ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असून, महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक भरती २०२५ अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १४ जून २०२५ या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून, उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
मुलाखतीचा पत्ता महात्मा गांधी विद्यामंदिर, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी, नाशिक-४२२००३ असा आहे. मुलाखतीची अंतिम तारीख १४ जून २०२५ आहे.
हे पण वाचा » पदवीधरांना नोकरीची संधी; पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत विविध पदांची भरती!
नाशिक येथे होत असलेल्या या भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी भरतीचे अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी, आपण https://mgv.kbhgroup.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.