महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात (Registration and Stamps Department, Maharashtra) ‘गट ड’ पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाने या संदर्भात जाहिरात क्रमांक 01/2025 प्रसिद्ध केली आहे. ही भरती ‘गट ड’ म्हणजेच शिपाई संवर्गातील रिक्त जागांसाठी होणार आहे.
शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणी
शिपाई पदासाठी सरळसेवेने अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. त्यानुसार, अर्जदार किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, म्हणजेच एस एस सी उत्तीर्ण असावा. निवड झालेल्या उमेदवारांना एस-०१ वेतनश्रेणीनुसार, रुपये १५००० ते ४७६०० या दरम्यान वेतन आणि शासनाच्या नियमांनुसार इतर भत्ते मिळतील.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. त्यानंतरच त्यांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. कृपया लक्षात घ्या की ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २२ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ आहे. तसेच, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख देखील १० मे २०२५ आहे. परीक्षेसाठीचे तुमचे ऑनलाइन प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षेची नेमकी तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्र तुमच्या प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक सूचना
सर्व इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी अर्जामध्ये अचूक आणि खरी माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे. जर अर्जात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास किंवा चुकीची माहिती नमूद केल्यास, तो अर्ज कोणत्याही क्षणी नाकारला जाऊ शकतो आणि याची संपूर्ण जबाबदारी केवळ उमेदवाराची राहील. एकदा अर्ज सादर केल्यानंतर, त्यातील कोणत्याही माहितीमध्ये बदल करण्याची मुभा नसेल. त्यामुळे, उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, आरक्षणाचे नियम आणि वयोमर्यादा काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात आणि त्यानंतरच अर्ज भरावा.
परीक्षेची तारीख, वेळापत्रक, नेमणूक केलेले परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक इत्यादी सर्व माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवारांना परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेसाठी स्वतःच्या खर्चाने हजर राहावे लागेल याची नोंद घ्यावी. ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणारी ही परीक्षा (Computer Based Test) महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील विविध शहरांमध्ये आयोजित केली जाईल. उमेदवारांनी एकदा निवडलेले परीक्षा केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
परीक्षा शुल्क
सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. 1000/- आहे. मागासवर्गीय उमेदवार आणि अनाथ उमेदवारांना रु. 900/- परीक्षा शुल्क भरावे लागेल. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की परीक्षा शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाईल आणि भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. शुल्क भरल्याची पावती उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
अर्ज भरण्यासंबंधी सूचना
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्जात कोणतीही खोटी माहिती देणे, कोणतीही माहिती लपवणे किंवा सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये बदल करणे यांसारखे गैरप्रकार आढळल्यास उमेदवाराची अर्ज करण्याची पात्रता रद्द केली जाईल, तसेच त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई देखील केली जाईल याची नोंद घ्यावी. उमेदवारांनी त्यांचे वय, जन्मतारीख आणि आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठीचे योग्य कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता नमूद करताना, उमेदवारांनी सादर केलेल्या गुणपत्रकावरील (Marksheet) नमूद केलेली तारीख ही त्यांची पात्रता दिनांक म्हणून ग्राह्य धरली जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम उमेदवाराला संबंधित संकेतस्थळावर स्वतःचे प्रोफाइल तयार करावे लागेल किंवा जर तुमचे प्रोफाइल आधीपासूनच असेल, तर ते अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करू इच्छिता, तो अर्ज काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्हाला विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. याव्यतिरिक्त, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यात दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी होणारे बदल संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील, त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी.
कागदपत्र पडताळणी
निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये अर्जदाराने दिलेली माहिती सत्य आहे असे स्वयंघोषणापत्र, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा दाखला, वयाचा पुरावा किंवा जन्म दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र, आरक्षित प्रवर्गातून निवड झाली असल्यास जात प्रमाणपत्र, तसेच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (जे चालू आर्थिक वर्षातील असावे), आणि जर उमेदवार दिव्यांग किंवा माजी सैनिक असेल, तर त्याचे आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात होत असलेल्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. त्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.