LIC HFL Apprentice program 2025: एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC Housing Finance Limited) यांनी पदवीधर झालेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत पदवीधर उमेदवारांना सॉफ्ट स्किल, डोमिन नॉलेज, रियल टाईम कामाचा अनुभव यासंबंधी योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू उमेदवारांना बँकिंग, फायनान्शिअल सर्विसेस आणि इन्शुरन्स क्षेत्रासाठी तयार करणे हा आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना योग्य ते मानधन देखील दिले जाणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) यांच्याकडून 250 उमेदवारांना अप्रेंटिस म्हणून सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा कार्यक्रम 12 महिन्यांसाठी आखला असून याची सुरुवात 14 जुलै 2025 पासून होणार आहे. अप्रेंटिस म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना 12000/- रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत अप्रेंटिस म्हणून सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता तो 01 जून 2019 रोजी किंवा त्यानंतर कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केलेला असावा.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अप्रेंटीशीप प्रोग्रॅम 2025 साठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम भारत सरकारच्या NATS या गव्हर्मेंट पोर्टलवर स्वतःची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. NATS पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर उमेदवार LIC HFL अप्रेंटिस जाहिरात पाहू शकतात.
हे पण वाचा » मुंबई विद्यापीठ अंतर्गत तरुणांना 151 जागांसाठी नोकरीची संधी!
यशस्वीपणे अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीच्या प्रशिक्षण जिल्ह्यांबद्दल info@bfsissc.com कडून ईमेल द्वारे माहिती देण्यात येईल. निवड प्रक्रियेमध्ये प्रवेश परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि वैयक्तिक मुलाखत या प्रक्रियेचा समावेश असेल. निवड प्रक्रियेसाठी प्रवेश परीक्षा भारतीय वित्तीय सेवा क्षेत्र कौशल्य परिषदेद्वारे घेण्यात येईल.
या परीक्षेमध्ये बँकिंग, गुंतवणूक, विमा, डिजिटल साक्षरता, इंग्रजी आणि मूलभूत संगणक ज्ञान या विषयावर एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी करणाऱ्या सामान्य आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्जाची शुल्क 944 रुपये असून अनुसूचित जाती जमाती आणि महिला उमेदवारांसाठी 708 आहे. पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 472 रुपये आहे.
हे पण वाचा » ठाणे येथील बी.एन.एन. कॉलेज येथे विविध ७७ पदांसाठी नोकरीची संधी!
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अप्रेंटीशीप प्रोग्रॅम 2025 साठी अर्ज करण्याची मुदत 13 जून 2025 ते 28 जून 2025 पर्यंत आहे. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. इतर महत्त्वाच्या तारखांसाठी खाली दिलेल्या लिंक वरील अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी.
LIC HFL अप्रेंटीशीप प्रोग्रॅम 2025 साठी ऑनलाइन नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी LIC HFL यांच्या संकेतस्थळावर: https://www.lichousing.com/ भेट द्या.