मुंबई विद्यापीठ अंतर्गत तरुणांना 151 जागांसाठी नोकरीची संधी! | Mumbai Vidyapeeth Bharti 2025

Mumbai Vidyapeeth Bharti 2025: मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ करिता विविध विभाग/संस्था/केंद्र, तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि उपपरिसरांमध्ये शिक्षकीय पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श महाविद्यालय, अंबाडवे, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे आणि ठाणे, रत्नागिरी येथील विद्यापीठ उपपरिसर तसेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाईड सायन्सेस, कल्याण यांचा समावेश आहे.

या भरती अंतर्गत एकूण 151 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २७ जून, २०२५ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरतीचा ऑनलाइन अर्ज https://muappointment-adhoc.mu.ac.in/ या लिंकवर शुल्क आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र यांच्या स्वसाक्षांकित कागदपत्रांसह सादर करावा लागेल.

खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. ५००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. २५०/- आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, त्याच्या दोन प्रती आवक विभाग, रूम नंबर २५, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई ४०० ०३२ येथे जमा करणे बंधनकारक आहे.

संगीत आणि कला प्रदर्शन, नाट्यकला, सहायक ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण विभागासाठी सहायक संचालक (शारीरिक शिक्षण आणि क्रीडा) आणि व्यवस्थापन, एमसीए, नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी यासारख्या विशिष्ट विषयांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहिरातीत नमूद केले आहेत.

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावर ५% गुणांची शिथिलता दिली जाईल. तसेच, १९ सप्टेंबर, १९९१ पूर्वी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या पीएच.डी. धारकांना ५% गुणांची शिथिलता (५५% वरून ५०%) मिळू शकते.

हे पण वाचा » ठाणे येथील बी.एन.एन. कॉलेज येथे विविध ७७ पदांसाठी नोकरीची संधी!

सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक अर्हतांमध्ये संबंधित विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांनी राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) किंवा UGC द्वारे मान्यताप्राप्त (SET) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

ही सर्व पदे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी किंवा नियमित नियुक्ती होईपर्यंत पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. पात्र उमेदवारांना प्रति महिना रु. ४५,०००/- आणि पदव्युत्तर पदवीसह बी+ स्तर असलेल्या उमेदवारांना रु. ३५,०००/- वेतन मिळेल.

हे पण वाचा » कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० जागांसाठी मेगाभरती सुरू!

भरती संदर्भातील आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीच्या तारखा, निकाल इत्यादी, विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केला जाईल. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क भरावे लागेल.

या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट द्या.