NEET 2025 चा निकाल आज जाहीर; येथे पहा एका क्लिकवर… | NEET 2025 Result @neet.nta.nic.in

NEET 2025 Result @neet.nta.nic.in: राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच NTA यांनी आपल्या माहिती बुलेटीनमध्ये यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे NEET 2025 चा निकाल आज 14 जून 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्सुकता लागलेली आहे. NEET 2025 चा निकाल फक्त ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

यामध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची किंवा टॉपरची नावे गुणवत्ता यादी मधून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रत्येक उमेदवारासाठी वैयक्तिक निकाल पत्र देखील देण्यात येणार आहे. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांनी https://neet.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर पहावी.

NTA यांनी त्यांच्या अधिकृत प्रेस रिलीज मध्ये टॉपर उमेदवारांची यादी, निकालाशी संबंधित असणारी इतर महत्त्वाची माहिती आणि आकडेवारी त्यामध्ये समाविष्ट असेल असे जाहीर केले आहे. ही गुणवत्ता यादी सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रत्येक उमेदवाराचे स्कोर कार्ड हे त्यांना फक्त वैयक्तिकरित्या उपलब्ध होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. NEET 2025 चा निकाल कुठे आणि कसा तपासायचा हे आपण जाणून घेऊ..

NEET निकाल २०२५ कसा तपासायचा?

NEET 2025 चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप फॉलो कराव्यात:

• सर्वप्रथम NEET च्या अधिकृत वेबसाईटला: https://neet.nta.nic.in/ भेट द्यावी.
• त्यानंतर NEET 2025 स्कोर कार्ड डाउनलोड यावर क्लिक करावे.
• त्यानंतर आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि ईमेल पत्ता किंवा मोबाईल नंबर आणि सुरक्षा पिन प्रविष्ट करावा.
• त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे.
• त्यानंतर NEET 2025 चे स्कोर कार्ड तुमच्या स्क्रीनवर दाखवले जाईल.
• पुढील कामकाजासाठी हे स्कोर कार्ड डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढून घ्यावे.