Punjab and Sind Bank Recruitment 2025: पंजाब अँड सिंध बँकेने एमएसएमई रिलेशनशिप मॅनेजर्स (MSME Relationship Managers) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे एकूण ३० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी इच्छुक आणि पात्र आहेत, त्यांनी १८ जून २०२५ या अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेची अधिकृत वेबसाइट punjabandsindbank.co.in ला भेट द्यावी.
या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२५ आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३३ वर्षे च्या दरम्यान असावे.
अर्ज शुल्कामध्ये SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी १०० रुपये अधिक जीएसटी आणि पेमेंट गेटवे शुल्क आकारले जाईल, तर सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी ८५० रुपये अधिक जीएसटी आणि पेमेंट गेटवे शुल्क असेल.
हे पण वाचा » ७ वी ते पदवीधरांना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत 529 पदांसाठी नोकरीची संधी!
PSB एमएसएमई रिलेशनशिप व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ नियमित पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी भारत सरकार/ सरकारी संस्था/ एआयसीटीई (AICTE) द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी.
पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत होत असलेल्या या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी पंजाब आणि सिंध बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.