Recruitment for various posts in ISRO

ISRO मधे 10वी पास, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) च्या प्रमुख आस्थापना असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. २९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक VSSC-३३२ नुसार, येथे सहाय्यक (राजभाषा), हलके वाहन चालक-अ, जड वाहन चालक-अ, अग्निशमन-अ आणि स्वयंपाकी या विविध पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२५ असून, उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता:

विक्रम साराभाई अवकाश केंद्र (VSSC) विविध पदांसाठी भरती करत आहे. सहाय्यक (राजभाषा) पदासाठी अर्जदारांकडे किमान ६०% गुणांसह विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, हिंदी टायपिंगमध्ये प्रति मिनिट २५ शब्दांचा वेग आणि संगणक वापराचे ज्ञान आवश्यक आहे. इंग्रजी टंकलेखनाचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या पदाच्या एकूण २ रिक्त जागा आहेत.

हलके वाहन चालक-अ या पदाकरिता अर्जदारांनी एसएसएलसी/ एसएससी/ मॅट्रिक/ १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि त्यांच्याकडे वैध एलव्हीडी परवाना तसेच हलके वाहन चालक म्हणून किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी एकूण ५ जागा रिक्त आहेत.

जड वाहन चालक-अ पदासाठी अर्जदारांनी एसएसएलसी/ एसएससी/ मॅट्रिक/ १०वी उत्तीर्ण असण्यासोबतच वैध एचव्हीडी परवाना आणि सार्वजनिक सेवा बॅज असणे आवश्यक आहे. उमेदवारांना एकूण ५ वर्षांचा अनुभव असावा, ज्यामध्ये किमान ३ वर्षे जड वाहन चालवण्याचा आणि हलके मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा. या पदासाठी एकूण ५ रिक्त जागा रिक्त आहेत.

अग्निशमन-अ पदासाठी अर्जदारांनी SSLC/SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यांनी संस्थेद्वारे निश्चित केलेली शारीरिक तंदुरुस्ती आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. या पदासाठी ३ जागा उपलब्ध आहेत.

स्वयंपाकी पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी SSLC/SSC उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यांना एखाद्या चांगल्या हॉटेल किंवा कॅन्टीनमध्ये स्वयंपाकी म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी १ जागा रिक्त आहे.

अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. अर्ज करण्याचा कालावधी १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून सुरू होईल आणि १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

पगार/वेतन:

सहाय्यक राजभाषा या पदाकरिता मासिक वेतन रुपये 25,500 ते 81,100 पर्यंत निर्धारित करण्यात आले आहे. तर, हलके वाहन चालक, जड वाहन चालक, फायरमॅन आणि कुक या पदांसाठी मासिक वेतन रुपये 19,900 ते 63,200 च्या दरम्यान असेल.

हे पण वाचा » नागपूर रेल्वे विभागात 10वी पास उमेदवारांसाठी 919 जागांसाठी नोकरीची संधी!

अर्जदारासाठी वयोमर्यादा:

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 38 वर्षे असावे अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा