SECR Railway Recruitment 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने विविध विभागांतील ‘इंटर्नशिप’च्या रिक्त जागांसाठी भरती सुरू केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५२३ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी SECR भरती २०२५ साठी निर्धारित पत्त्यावर अंतिम मुदतीपूर्वी ऑफलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२५ आहे.
भरतीच्या रिक्त जागा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत इंटर्नशिपच्या एकूण ५२३ जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासंबंधी माहिती
उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या नमुन्यात “कार्मिक विभागाचे कार्यालय, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर, छत्तीसगड.” या पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट: https://secr.indianrailways.gov.in/ ला भेट द्यावी.
विभागानुसार पदांची संख्या:
फायनान्स मॅनेजमेंट (10 पदे), मेकॅनिकल (230 पदे), इंजिनीअरिंग (सिव्हिल) (50 पदे), इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (36 पदे), कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी/ इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन (150 पदे), मटेरियल मॅनेजमेंट (2 पदे), एचआर मॅनेजमेंट (40 पदे), आणि ईडीपीएम (5 पदे).
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता समबंधी जाणून घ्यायचे झाल्यास, अर्जदारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
हे पण वाचा » IDBI बँकेत होत आहे तब्बल 675 जागांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू…
अधिकृत जाहिरात
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत होत असलेल्या या भरतीचा ऑफलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहितीसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.