Advertisement
SSC Recruitment 2025

१० ते पदवीधरांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल २४२३ पदांची भरती!

SSC Recruitment 2025: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने फेज १३ सिलेक्शन पोस्ट भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत विविध शासकीय विभागांमध्ये एकूण सुमारे २४२३ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २३ जून २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम संधी आहे.

उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in वर भेट देऊन अर्ज भरावा. तसेच, खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून SSC सिलेक्शन पोस्ट फेज १३ भरती २०२५ साठी थेट अर्ज करता येईल.

अर्ज प्रक्रियेची माहिती

कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

अर्ज शुल्कामध्ये उमेदवारांच्या प्रवर्गानुसार सवलत देण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर, महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक (ESM) आणि विकलांग व्यक्ती (PWD) यांच्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.

हे पण वाचा » थेट मुलाखतीद्वारे, नवी मुंबई येथे ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ या पदांची भरती!

अर्ज करण्याची पद्धत आणि अंतिम तारीख

या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. इच्छुक उमेदवारांनी २३ जून २०२५ या अंतिम तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

• मॅट्रिक लेव्हल: मॅट्रिक लेव्हलच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी किंवा हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इंटरमिजिएट लेव्हल: इंटरमिजिएट लेव्हलच्या पदांसाठी, उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 किंवा इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
बॅचलर पदवी लेव्हल: बॅचलर पदवी लेव्हलच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (ग्रॅज्युएशन) केलेले असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा » ७ वी ते पदवीधरांना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत 529 पदांसाठी नोकरीची संधी!

उमेदवारांची वयोमर्यादा

दहावी आणि बारावी स्तरावरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ किंवा २७ वर्षांपर्यंत असावे. तसेच, पदवी स्तरावरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होत असलेल्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. सर्व पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.